गुरुवार
रविवार
अद्वैत
तो भास एक होता
स्वप्नात जाहलेला
माझ्या तुझ्या जगी या
नवं दीप लावणारा ..........
यावे कसे जुळुनी
आपुले अबोल नाते
ते गीत तू म्हणावे
स्वप्नात रोज रात्री ............
कसे कुणा कळावे
हे गुज अंतरीचे
जाणुनी घे सख्या रे
हि ओढ स्पन्दनीची......
तो भास स्वप्नीचा रे
हुरहूर सोडी मागे
वाटे जुळुनी यावे
अद्वैत प्रीतीचे रे ....................
गुरुवार
मुक्त काव्य ...... अनोळखी नाती
ऋणानुबंधांची हि कोणती नाती
जन्मोजन्मीचा प्रवास करून
नवीन रुपात पुन्हा पुन्हा भेटत राहतात ?
पहिल्याच भेटीत ओळख पटावी
अशी अनोळखी माणस
का अचानक जवळची वाटतात ?
अव्यक्त असणारे निशब्द भाव
कसे समजतात
त्या अनामिक नात्यांना ?
कशा दाटून येतात भावना
संदर्भाविना सार्या
आर्ततेचा हा खेळ
का होतो जीवघेणा ?
जन्मोजन्मीचा प्रवास करून
नवीन रुपात पुन्हा पुन्हा भेटत राहतात ?
पहिल्याच भेटीत ओळख पटावी
अशी अनोळखी माणस
का अचानक जवळची वाटतात ?
अव्यक्त असणारे निशब्द भाव
कसे समजतात
त्या अनामिक नात्यांना ?
कशा दाटून येतात भावना
संदर्भाविना सार्या
आर्ततेचा हा खेळ
का होतो जीवघेणा ?
बुधवार
डोळा दाटून येते पाणी...
कधी कसे कोणासाठी
डोळा दाटून येते पाणी .....
ओठावरती नकळत येती
दर्द भरली आर्त गाणी.....
रात्रीच्या तिमिरात आठवे
गत क्शणाची मान्दियाळी....
आठवे अचानक जुन्या घराच्या
तूळ्शी समोरची रान्गोळी.....
स्पर्श आजीचा आठवतो मग
हवा उबेचा निवारा......
आठवती मग असेच काही
मन माझे गहिवरुन येई.......
आज हवी मज माझी आई
गावया मज अन्गाई.....
येशील का ग परतून कधि
दूर देशी जी गेली निघोनी....
दूर देशीचा गाव असा
कोणालाहि ठाऊक नाहि....
कसे भेटावे सान्ग तुला
मन माझे आक्रन्दत राहि....
शनिवार
अजून वाटते नवे......
चालता तुझ्यासवे अजून वाटते नवे
ह्रुदयी वसन्त फ़ुलतो हासता तुझ्यासवे
इथेच प्रीति फ़ुलली , आशा मनात झूरली
नेत्रास नेत्र मिळ्ता , तुलाच सर्व वाहिले
नविन आज भावना , नवेच सर्व भास हे
स्वप्न हि नवे नवे पाहिले तुझ्यासवे
अजून हि ओढ हि फ़ुलविते तुझ्यामना
हातात हात गुम्फ़िता ,तुझ्यात मी विसरते
बुधवार
HAPPY NEW YEAR
My life is going
silent and quite
memories makes me....
sad and fine......
sometimes life like
golden shine....
sometimes it is a cloudy
night..............
schooling days
like a flowery phase
i remember teachers
and all good friends
oh my mother
my sweet sweet mother
remember you too much
my mind going to fear
please come here....
learn from life
its going fast
never coming those days
we left in the past.....
every year i think
about last year
and says everybody
HAPPY NEW YEAR............
HAPPY NEW YEAR................................
silent and quite
memories makes me....
sad and fine......
sometimes life like
golden shine....
sometimes it is a cloudy
night..............
schooling days
like a flowery phase
i remember teachers
and all good friends
oh my mother
my sweet sweet mother
remember you too much
my mind going to fear
please come here....
learn from life
its going fast
never coming those days
we left in the past.....
every year i think
about last year
and says everybody
HAPPY NEW YEAR............
HAPPY NEW YEAR................................
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)


