Powered By Blogger

WELCOME FRIENDS....

swagatam..............















शनिवार

sometimes.................




sometimes i look
in to the mirror
and ask myself
why i love you.............
sometimes when i
see you in my dream
i asks you
why i love you...........

sometimes i
listen your
melodious voice..
i feel ,
i love you ......i love you.........................

pahatechi vat pahanarya kalila.....


एक वय असंही असत.... डोळ्यांत फुलपंखी स्वप्न असत....सखे त्याचवेळी खूप सावरायचं असत .....वाढणार वय, खुलणार रूप कोणीतरी न्याहाळावस वाटत .....पण सखे त्याचवेळी खूप जपायचं असत ......नको वाटतात उपदेश जनाचे , वाटते फक्त ऐकावे मनाचे ......पण सखे , सौंदर्याच्या याच पडद्याने झाकू नकोस तुझे डोळे ....
तू उमलू पाहणारी नाजूक कळी.... उमलण्यासाठी पहाटेची वाट पाहणारी ......आणि गोड गुलाबी स्वप्नात रमणारी नवं युवती.....सखे, अनेक लालसी डोळे तुझ्या एका हास्यासाठी आतुरलेले आहेत, कारण तुझ्या एका स्मित हास्याने त्यांना मिळेल संधी तुला आजमावण्याची...... तुला हवा आहे एक राजस प्रियकर ......पण अनेक जण असतील तुझ्या आसपास अती भयंकर....तुझ्या सौंदर्याला जोड आहे निरागस भावनांची...पण त्या लालसी डोळ्यांना संधी हवी आहे फक्त तुला खुडायची ......सखे, खूप नाजूक आहे ग तुझं तन आणि मन.......त्याला जपायला हवं......
एकाच या वयात असते जग जिंकायची इच्छा, स्पर्धा, परीक्षा , संधी यातून यश मिळवण्याची आशा........
याच वयातून होत असतो प्रवास भावनांचा ...... हळवेपणा तर असतो याच वयाचा सखा ........
सखी, तुला जपायला हवं अस वारंवार सांगते आहे ....हे वय फुलवायचं असत गोड गुलाबी स्वप्नांनी .......स्वप्न पूर्ण होण्यासाठी थोडा धीर धरावा लागतो आणि आपलं हे सुंदर वय आपणच अलिप्तपणे पहायचं असत ........
अनेक भेटतील तुला खुश करणारे, हसवणारे, या वाटेमध्ये ............पण , त्यांचा हेतू लक्षत घे , त्यांना हवं असेल काही वेगळ ज्याची तू कधी कल्पनाही नसेल केली.... तेव्हा कुठे थांबायचं - नकार कुठे द्यायचा - हे तुला कळायलाच हवं .... जादुगार नयन तुझे, किंवा स्पर्श तुझा रेशमी ...अशी अनेक गाणी गाणारे असतील तुझ्यासाठी, पण त्यांचा गाणी म्हणूनच आस्वाद घे , त्याच काव्य तू नकोस होऊ ......कारण उमलण्याच्या आधी फुलांचा सुगंध नाही ग दर्वळत......वाटेवरती काटे ग....जपून टाक तू पाऊल ग ..... काटा पायात गेल्यावरी खुपेल ग तो तुझ्या उरी......सांभाळ पोरी आईचे शब्द आठवतील मग खरोखरी .....समजेल मग दुनिया सारी, पश्चातापाची खोल दरी....
सखी... हे सार सोसण्याचं बळ आहे तुझ्यात ?....नाही ना? सखी तू आहेस शक्ती , तूच आहेस प्रीती ,
तूच घडवणार आहेस पुढची पिढी .....काळ बदलेल संकल्पना बदलतील पण निसर्ग नाही बदलणार , तेव्हा त्या निसर्गाला समजून घे ...पण गंभीर होऊ नकोस ह कारण हेच वय आहे फुलायचं आणि फुलपंखी स्वप्नात रमायचं...
फक्त स्वप्न पहायचं आणि ती पूर्ण होण्यासाठी मेहेनत घेण्याच....