Powered By Blogger

WELCOME FRIENDS....

swagatam..............















बुधवार

डोळा दाटून येते पाणी...


कधी कसे कोणासाठी
डोळा दाटून येते पाणी .....
 ओठावरती नकळत येती
  दर्द भरली आर्त गाणी.....
                     रात्रीच्या तिमिरात आठवे
                     गत  क्शणाची  मान्दियाळी....
                     आठवे अचानक जुन्या घराच्या
                    तूळ्शी समोरची रान्गोळी.....
          स्पर्श आजीचा आठवतो मग
           हवा उबेचा निवारा......
           आठवती मग असेच काही
           मन माझे गहिवरुन येई.......
                   आज हवी मज माझी आई
                    गावया मज अन्गाई.....
                    येशील का ग परतून कधि
                    दूर देशी जी गेली निघोनी....
दूर देशीचा गाव असा
कोणालाहि ठाऊक नाहि....
कसे भेटावे सान्ग तुला
मन माझे आक्रन्दत राहि....
          

२ टिप्पण्या:

  1. खूपच छान कविता.
    " दूर देशी जी गेली निघोनी....
    ....मन माझे आक्रन्दत राहि...."
    या ओळी तर खूपच बोलक्या आहेत. माझ्या आठवणी चाळवणाया आहेत. पण कही इलाज नाही. असे कधीतरी होतच राहणारच. म्हणून काय वाचायचे नाही?
    चैत्राली, तुझी शब्दांची निवड खूप छान आहे. "मांदीयाळी" हा शब्द किती पर्फ़ेक्ट बसतोय तिथे.
    वा. खूपच छान.

    उत्तर द्याहटवा